Surprise Me!

धक्कादायक: कोल्हापुरात खाद्य पदार्थाच्या गाडीवर स्वच्छता गृहाचे पाणी | Kolhapur | Panipuri | Sakal

2021-04-28 1,648 Dailymotion

कोल्हापूर - पाणीपुरीच्या गाडीवर स्वच्छतागृहाच्या पाण्याचा वापर होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसा अज्ञातांनी रंकाळा येथील पाणीपुरीचा गाडा पाडून त्यातील साहित्य विस्कटून दिले. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु या व्हिडिओमुळे नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत होता. <br /><br />ताराबाई रोड ते संधामठाकडे जाणाऱ्या मार्गावर एका स्वच्छता गृहाच्या वरील टाकीचे पाणी एक व्यवसायिक भरतो. त्यानंतर तो ते पाणी पाणीपुरीच्या गाडीजवळ ठेवलेल्या स्टिलच्या पिपात ओतत असल्याचे दिसून आले. जसजसा हा व्हिडिओ व्हायरल झाला तस तसे याबाबत संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या. <br /><br />दरम्यान, सायंकाळी काही अज्ञातांनी रंकाळा येथील एका पाणीपुरीच्या गाडीवर हल्लाबोल केला. ती गाडी पलटी करून त्याच्याकडील पाणी व पुऱ्या रस्त्यावर फेकून दिल्या. अचानक घडलेल्या या प्रकरामुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. रंकाळा येथे दररोज मोठी गर्दी होते. अशा गर्दीच्या ठिकाणी असा प्रकार होत असल्याबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केलाजात होता. पण रात्री उशिरा पर्यंत याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.

Buy Now on CodeCanyon